kashamir news
महाराष्ट्रातील 500 पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल 184 प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली 232 प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय मुंबई : प्रतिनिधी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती, त्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी...