स्वामी समर्थ न्यूज
आज स्वामी प्रकटदीन सोहळा मुलुंड येथे होणार मुंबई : प्रतिनिधी स्वामी सिद्धिमुळे सुप्रसिद्ध कलाकार, लेखक, दिग्दर्शक श्री नितीन प्रकाश तळपदे स्वामीमय झाले. त्यांच्या कृपेमुळे स्वामी भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ निवास उपासना मठ मुलुंड (पश्चिम ), याची स्थापना सन 2002. ला झाली. समाधी मठ, अक्कलकोट येथील स्वामी चरण स्पर्श झालेल्या स्वामींच्या पादुका चोळप्पांचे वंशज श्री. अप्पू महाराज यांचे कडून स्वामींच्या आदेशानुसार श्री नितीन प्रकाश तळपदे ऊर्फ परमपूज्य सद्गुरु श्री शिवदत्त दादा महाराज यांना देण्यात आल्या आहेत,त्याची स्थापना सदर मठात करण्यात आली आहे. सदर मठ हा निवासी संकुलात असल्याकारणाने स्वामी भक्तांसाठी फक्त गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 ते 8:30 पर्यंत दर्शनासाठी खुला ठेवण्यात येतो. या दिवशी स्वामींची आरती ठीक 7:00 वाजता सुरू होते व त्यानंतर तीर्थप्रसाद ( भंडारा ) सुरू होतो. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, नवरात्र तसेच स्वामी प्रकट दिन...