AIM news
कृषी उद्योगातील परिवर्तनासाठी एआयएम कॉन्क्लेव्ह सज्ज मुंबई / रविंद्र भोजने भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱी " ऑल इंडिया अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन " ने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (AIM B2B ) बीटूबी परिषद आयोजित केली आहे. एआयएमतर्फे आयोजित ही दुसरी परिषद आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कृषी इनपुट क्षेत्राला समर्पित एक विशेष प्रदर्शनासह या परिषदाचे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये आयोजन केले आहे. येत्या ३ आणि ४ मार्च २०२५ रोजी ही परिषद होईल अशी माहिती एआयएम असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे सचिव समीर पाथरे आणि खजीनदार सर्जेराव शिसोदे उपस्थित होते. कृषी- निविष्ठा (इनपुट) उद्योगाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसचे भारतातील कृषी- निविष्ठा (इनपुट) उद्योगाला बळकटी देण्याचा प्रयत्न या परिषदेव्दारे केली जाणार आहे, ज्यामुळे जोडणी, सहयोग आणि वाढीस...