नाथस्वामी मठ बातमी
मुंबईत नाथस्वामी बेकरी मठातर्फे ५०० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मुंबई :(रविंद्र कुडाळकर, मुख्य प्रतिनिधी ) मुंबईच्या लोअर परळ भागातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नाथस्वामी बेकरी मठातर्फे ५०० गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना परमपूज्य सद्गुरू श्री.नाथस्वामी यांच्या हस्ते उत्साही वातावरणात हजारो शुभ चिन्हांकित वह्यांचे वाटप करण्यात आले. नाथस्वामी बेकरी मठातर्फे सातत्याने बहुविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच्याच एक भाग म्हणून परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज, बुद्धी दैवत गणपती आणि सरस्वती माता यांचा आशीर्वाद लाभून विद्यार्थी शालेय जीवनात यशस्वी व्हावेत आणि त्यांना थोडी मदत मिळावी या उद्देशाने गरजू विद्यार्थ्यांना नुकतेच वह्यांचे वाटप करण्यात आले. बेकरी मठाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पालक, ...