विवेकानंद एज्युकेशन सोसायटी
"विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज मध्ये 'RAGA 2025' कार्यक्रम उत्साहात साजरा मुंबई : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या मास मीडिया विभागाच्या वतीने 8 आगस्ट 2025 रोजी ‘Raga’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाटिका आणि अन्य कलाप्रकारांतून आपली सर्जनशीलता सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यकमास ख्यातनाम छायाचित्रकार हेमंत राम मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी रक्षा बंधन (२०२२), दर्भा (२०२३) आणि हमारी राम लीला (२०२४) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. प्राचार्य डॉ. (सौ.) अनीता कानवर, उपप्राचार्या डॉ. ऋतिका माखिजानी व सौ. समीथा शर्मा काइन तसेच विभाग प्रमुख सौ. प्रितिका खेडवाल याही उपस्थित होत्या. या वेळी एका कथानकाद्वारे जनरेशन-झेड एनआरआय मुलगी भारतात येऊन विवि...